बंधुप्रेम
बंधुप्रेम
कसा साधला डाव येथे यमाने
कसे मायबापास नेले क्रमाने ।।१।।
कसा घात झाला कसा काळ आला
कसा बालकांना सतावून गेला ।।२।।
कसे डोंगरा एवढे दुःख आले
पित्याचे कसे छत्र हरवून गेले ।।३।।
जरी सोडले पोरके आपल्याला
तरी काळजी ती करावी कशाला ।।४।।
नको आसवे आज डोळ्यात आणू
नको तू कशाचे जगी दुःख मानू ।।५।।
कशाला इथे लागतो घाबराया
शरण आज जाऊ तया देवराया ।।६।।
जगी ज्यास कोणी नसे पाळणारा
असे देव तो त्यास सांभाळणारा ।।७।।
दिले दात त्याच्या मुखी घास देतो
तयाच्या कृपेने इथे श्वास घेतो ।। ८।।
तुला मी कधी दुःख देणार नाही
सुखाने कधी झोप घेणार नाही ।।०९।।
तुला घेतले काळजाशी अता मी
तुझा मीच भाऊ तुझा रे पिता मी ।।१०।।
तुझी माय होईन खाण्यास द्याया
तुझा मित्र होईन रे खेळवाया ।।११।।