पहिला पाऊस-कविता-
पहिला पाऊस-कविता-
ढग आकाशात आले
धरती काळीभोर झाली
सारा अंधार दाटला
थेंब टपोरे पडले
सुरु पाऊसाचे आगमन
गंध मातीचा दरवळला
त्यात गार वारा सुटला
पाऊसाच्या स्वागताला
झाला आनंद धरतीला
बेडकांचा सूरावर सूर
इशारा शेतकरी राजास
आता लागा पेरणीला
रान सारे खुश झाले
लागली चाहूल पोटाला
चोहीकडे आनंद दिसे
आपल्या मजूर वर्गाला
अवंदा जाईल दुष्काळ
पाणी मिळेल पिण्याला
आशा मनी दाटल्या
मुकी जनावरे जगण्याला
सारे जीव सुखावले
गाणे मुखातून वदले
नाही श्रीमंतीची हाव
कष्ट करण्यास निघाले
सुरु झाली पेरणी
संगे राजा आणि राणी
कष्ट उद्याच्या आशेवर
पुर्ण होईल जीवनी