सख्या
सख्या
आयुष्य हे खूपच सुंदर सख्या ,
पण, तुझ्याविना ते शून्यच रे...
अधूरे हे गीत गुणगुणणे ओठी ,
पण, तुझ्याविना ते बेसूर रे ...
नक्षत्रांचे पसरले गोड चांदण वर्षाव ,
पण, त्या शीतलतेला झळ पोहचते रे ...
हास्याचे निर्झर पाझर उमटले मुखावर,
पण, तुझ्याविना ते गेलेत रे ...
परतुनी येणारे क्षण प्रीतीचे सख्या ,
पण, तुझ्याविना ते नामंजूर रे ...
आयुष्याचे हे गुपित तिजोरीत सख्या ,
अमूल्य दडलेले धन तूच रे ...