Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

आवतनं

आवतनं

1 min
6.8K


का कुणास ठाऊक, का असं होतं?

अकारण चारचौघात हसं होतं

चालतो मी हरेक नात्याला न्याय देत

पण सारं काही व्यर्थ निस्फळ होत जातं 

कुठवर चालाव्यात या दीशाहीन वाटा

का म्हणुन भोगाव्यात मी मरण यातना?

मागावीच का लाचार जगण्याची  भिक्षा

भोगावीही का म्हणून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा? 

मुखवटे धारण करणा-यांचीच इथे चालती आहे

ज्याच्या हातात ससा तोच इथे पारधी आहे

मारणारेही ते्च अनं तारणारेही तेच आहेत

कुंपणानेच शेत खाल्ले हाच खरा पेच आहे 

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

भरपूर वाढतोय, खरकटं पाडा की पोटभर जेवा

समाधानाच्या ढेकरा देत बिनधास्त जावा

आमचं आवतनं (चूल बंद) आग्रहाचं इतरांनाही सांगा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational