Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
वारी
वारी
★★★★★

© Jayshri Dani

Classics

1 Minutes   13.5K    21


Content Ranking

विठू भेटीला आल्या सरी

आषाढीला रंगे पंढरी

तुका ज्ञानीयाच्या पालखी

बैसले सावळे श्रीहरी !


माथी चिंता अखंड जरी

सोहळा चन्द्रभागातिरी

टाळ मृदुंगात दंगले

भोळे भाबडे वारकरी !


एकच नाद अनाहत

संगे तुळशी डोईवरी

अश्वाचे रिंगण सुंदर

दुमदुमतो घाट,दरी !


निर्गुण सगुणाचा असे

सदा सुखानुभव वारी

मना लाभतो परमानंद

श्री रुखमाईच्या माहेरी !


मम भाग्य अनुपम,तू

आश्रये मज नित्य दारी

सुखदुःखाच्या फेऱ्यातही

अनवाणी पायास उभारी !

वारी पंढरी विठोबा

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..