Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

गंध फुलांचा

गंध फुलांचा

1 min
6.6K


सुगंधी फुलांचा गजरा,  केसात माळला मी।

वेणीत केशराचा,  सडा सांडला मी।। 

मोकळे केश रेशमी,  उन्हात सुकविले मी।

सुवासे प्रियाचा, मदन जागविला मी।। 

भिजून चिंब ओला,  स्वप्नात नाहलो मी।

केसात ओघळणारा,  दवबिंदू जाहलो मी। 

गंधित त्या क्षणाचा,  सुगंध घेतला मी।।

भेटीत या सुखाचा,  आस्वाद घेतला मी। 

 बहरून प्रीत येता,  मिठीत घेतले मी।।

मुकी अबोल गाणी,  खुशीत गाईली मी।। 

मनात प्रीती फुलता, ओठास चुंबिले मी।

मऊ मखमली क्षणाचा,  आधार घेतला मी।। 

गालास लागलेल्या, लालीस पाहिले मी।

डोळ्यात रेखलेल्या,  काजळात शोधिले मी।। 

फुलात पाकळीला,  नयनात पाहिले मी।

उमलत्या कळीला,  फुलात पाहीले मी।।


Rate this content
Log in