अशीच वेळ
अशीच वेळ
एक वेळ ही
अशीच यावी
तुझी न् माझी
भेटच व्हावी।।धृ।।
घेईन तुला
घट्ट मिठीत
सांगेन कानी
प्रेम गुपित
तुझीही मिठी
सैल नसावी।।1।।
डोळे भरुनि
तुला पाहीन
तन-मन हे
सारे वाहीन
भेट अपूर्व
सदा स्मरावी।।2।।
तू राजा अन्
मी तुझी राणी
तुझ्याचसाठी
गाईन गाणी
साथ मजला
तुझी असावी।।3।।
तुझ्या मिठीत
विसावेन मी
विरह कळा
विसरेन मी
तमा जगाची
जरा नसावी।।4।।