बाल कविता - नाजूक फुले
बाल कविता - नाजूक फुले
1 min
6.8K
पहाटवेळी किरणे कोवळी
कित्ती छान दिसती
या पानी- त्या पानी
चमचमते मोती जणू
बागेत असती फुलपाखरे
रंगांची एक शाल जणू
पहावी फुलणारी फुले
पिवळी-केशरी-लाल जणू
हळूच या रे तुम्ही सारे
फुलांसंगती खेळण्या रे
फुले किती नाजूक नाजूक
जशी चिमुकली बाळे जणू