Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

वंदूया संस्काराला'

वंदूया संस्काराला'

1 min
288



वंदू या संस्काराला, जिजाऊंच्या वंदू या संस्काराला

त्यांच्या संस्काराने घडला, बाळ शिवाजी देशाला

कर्तुत्वाने छत्रपती हे नाव शोभले शूर वीराला

डंका वाजतो चारी दिशांना,शहाजीपुत्राचे जगाला

शिवाई देवीच्या नावावरुन नाव ठेविले शिवबाला

वंदू या........

बालपणात अत्याचाराची चीड होती शिवबाला

रयतेच्या रक्षणाला ,रक्त सळसळले अंगाला

त्यांच्या जन्माने आनंद झाला शिवनेरी किल्ल्याला

बहुजनांच्या कल्याणाचा विडा त्यांनी उचलला

वंदू या..........

अत्याचाराच्या नाशासाठी, फौज मावळ्यांची सोबतीला

तलवारी ,भाले घेतले अत्याचाराला संपविण्याला

तुळजा भवानी मातेचे बळ होते शिवबाला

एकामागोमाग लढायांत जय शिवबास मिळाला

वंदू या.........

तानाजी मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे सरदार जोडीला

शत्रुंचा नायनाट त्यांनी निकराने केला

महाराजांची तोफ गर्जली आवाज त्यांनी ऐकला

बाजीप्रभुने त्याच वेळी प्राण धरतीवर सोडला

वंदू या........

रयतेच्या रक्षणासाठी,राज्याभिषेक सोहळा रंगला

काशीचा गागाभट्ट पंडीत आला ,धार्मिक विधी करण्याला

छत्रपती राजे शिवाजी, नामकरण सोहळा पार पडला

बहुजनांचे राजे झाले ,आदर्श दिला महाराष्ट्राला

वंदू या.......

बहुजनांचे प्रतिपालक तुम्ही,रायगड पावन केला

थोर संतांचा, महापुरुषांचा आदर्श तुम्ही दाखविला

स्वराज्य रक्षणासाठी देह सार्थकी लागला

आठवण तुमची महाराष्ट्राला, सूर्य, चंद्राच्या जोडीला

वंदू या.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational