गुरुचे महत्व
गुरुचे महत्व
तुझी ऐकून कहाणी, साई शिर्डीस आलो|
तुझा महिमा पाहुनी, साई मनी सुखावलो||धृ||
ऐकून रे होतो बाबा, तुझा भोळा भक्तिभाव|
ढोंगी साधूसंतांसी नाही, कळला तुझा देव||
कोण म्हणे साई तुला, तू रे जातीचा फकीर|
राम रहिम अल्ला सारे, तुझे शक्तीचे भांडार||
जात-पात धर्म-पंथ इथं, सर्वधर्म समभाव|
कोण्या एका जाती-धर्मासाठी, नाही इथं वाव||
म्हणूनच बाबा-साई, तुझ्या दर्शनास आलो||१||
काय नाव गाव तुला, नाही आई-बाप ठाव|
खऱ्या साईच्या सेवेला, नाही कशाचंच भ्याव||
गोरगरीब श्रीमंत सारे, साई तुझे नाम घेई|
किती उद्धरले जन, राजे रजवाडे बाबा साई||
दिवा तेल नाही तरी, पाणी दिव्यात पेटले|
पाणी डोळ्यात साठले, भाव मनात दाटले||
चिमटा खणाणता तुझा, भुई अंगार वन्य झालो||२||
मनाचा आधार साई, सुखाचा सागर|
श्रद्धा नी सबुरी, हाच साईचा जागर||
तुझा नाम जप बाबा, राम अल्ला साई|
कबीराच्या दोह्यासंगे, तुका अभंगात गाई||
साईच्या भक्तित लोका, देव दिसे ठायीठायी|
तुझ्या दर्शनाने बाबा, सारे दुःख सरून जाई।।
म्हणूनच साई तुझ्या, भक्तिरसात न्हालो||३||