Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Romance

2  

Trupti Naware

Romance

एक हरवलेली ओळ

एक हरवलेली ओळ

1 min
365


माझ्याच कवितेतली


एक हरवलेली ओळ


शोधले तिला जुन्या कवितेत


लिहिले काहीसे नव्या कवितेत


पण मिळत कुठेच नव्हती 


ती हरवलेली ओळ


तिच्यावरचे शब्द हृदयाची


स्पंदन वाढवायचे


तिच्यातला गंध सारे 


विसरायला लावायचे 


पण ती दिसेनासी होता


उठली वेदनेची कळ


माझ्याच कवितेतली


एक हरवलेली ओळ


ती शोधताना झाली 


जगण्याची तडफड


पानं फडफडली चाळताना


शब्दांचा झाला कल्लोळ


माझ्याच कवितेतली 


एक हरवलेली ओळ


शोधुन संपले सारे मग


गाठला आकाशाचा तळ


नभातल्या चांदण्यात


उडाली एकच खळबळ


हुंदका गळ्यात दाटतो


धुंडाळता तिला गगनभर


माझ्याच कवितेतली


एक गोजीरी ओळ लडिवाळ



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance