मनाचिये गुंफी
मनाचिये गुंफी
मनाचिये गुंफी, गुंफावे विचार
तैसाचि आचार, असो द्यावा।।
मनाशी विचार, सरळ असावा
संशय नसावा, थोडासाही।।
मनाचा सागर, मंथन करावा
हृदयी धरावा, प्रेम भाव ।।
मनाचिये गुंफी, मोद साठवावा
नित्य आठवावा, पांडुरंग।।
नाती गोती सारी, मायेचा बाजार
एक तो ईश्वर, सत्य आहे।।
वाणी "पंडिता"ची, झिजो गूण गाता
तया भगवंता, नित्य स्मरो।।