चला खेड्याकडे
चला खेड्याकडे
1 min
1.6K
खरे वैभव पाहण्या जाऊ गडे
विसराया चिंता चला खेड्याकडे.
सडा शेणाचा, अंगण दिसे छान
पाहुनिया हरपते देहभान.
नाद भुपाळीचा घुमतो राऊळी
वृंदावनी उभी तुळस सावळी.
किलबिल करती झाडांशी पक्षी
स्वागताला सज्ज रांगोळीची नक्षी.
ओढा खट्याळ नि पारम्ब्या वडाच्या
घेती कुशीत त्या सावल्या झाडाच्या.
नको उगा चिंता,नको उगा रडे
फुलवाया हसू चला खेड्याकडे.