Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Punyashil Wankhade

Others

3.6  

Punyashil Wankhade

Others

एक बहीण अशीही

एक बहीण अशीही

1 min
30.8K


का म्हणून काय माहिती झोप मला आज येत नव्हती।

कारण हेच की आज जणू तुझ्यावर कविताच बननार होती ।।


जीवनातील प्रत्येक कठीण क्षनांना सामोरे जाण्याची ताकत तुझ्यात आहे ।

म्हनूनच देवाने तुला समजूतदार नंदकिशोर दिला आहे ।।


असेल तुझ्या आयुष्याच्या शिदोरीत सुख दुःखाचा भरपूर वाटा ।

कधी असेल सागर सुखांचा तर कधी असेल दुःखाच्या रागावलेल्या लाटा ।।


आज चा दिवस तुझा आहे एक स्मितहास्य देऊन दे ।

विचार न करता भविष्याचा आजचा क्षण तू जगून घे ।।


किती सरळ साधा असा तूझा स्वभाव आहे ।

जशी पाकळी गुलाबाची हळूच बहुरून येत आहे ।।


तुझं आयुष्य असो सदाफुली सारख सदैव बहरणारं ।

संकट आले कितीही तरी त्यांना मार्ग दाखवणारं ।।


Future च planning करताना मागे वळून कधी पाहू नको |

तुझा एक भाऊ पण आहे हे कधी विसरू नको ।।


होतील तुझ्या मनोकामना पूर्ण आशीर्वाद देवाचा तुला आहे ।

सुखी राहो नेहमी तू एवढीच वंदना देवाला माझी आहे ।।


Rate this content
Log in