वाट काट्यांची.
वाट काट्यांची.
1 min
1.2K
अंधा-याकाळोखात,
घात विश्वासात
जगू या मरू
भीती त्यांस जातींची
वाट काट्यांची.
सुखासाठी सर्व जगे
मरणाऱ्यांस कोण मारे
आकांक्षा नाही
एकटेपणाची,
भीती तिस नात्यांची
वाट काट्यांची.
साथ नाही कोणाची,
भूक मारे पोरांची,
जगापुढे करावे काय,
हात पसरे माय
भीती तिस पैशांची
वाट काट्यांची.
किंमत नाही मोलाची,
आस तिस पोरांची
संपुनिया खेळ सारा
भीती वाटे स्वतःची,
वाट काट्यांची.
-नागेश(ndd)