Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Tragedy Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Tragedy Others

पोहचण्या त्या तिथे

पोहचण्या त्या तिथे

1 min
370


कळत नकळत

पोहचत होतो

एका ठिकाणाहून

दुसऱ्या ठिकाणी


आईच्या कुशीत

प्रवासाची सुरवात झाली

नातेवाईकांच्या अंगाखांद्यावर खेळत

गेले बालपण मज्जेत


आजी आजोबांचा हात धरून 

दुचाकी, तीन चाकी

गोल गोल फिरवत 

आनंद लुटला अमाप


आई-बाबांचा हात धरून

रडत पहिलं पाउल टाकलं

शाळेच्या बसमधे 

तर कधी आईच्या दुचाकीवर शिक्षणासाठी


रेसर सायकल हाती आली

क्लासला मित्रांसोबत जायला यायला छान

दहावीचा क्लास, शाळा वेळ नसे हाती खूप

आईची स्कुटी घेऊन पळायचो वेळ वाचवण्यासाठी


कॉलेजला जाताना

मुलींवर शाईन मारायला 

बाईक हट्टाने घेतली हाती

अभ्यासावरचे लक्ष उडणार नाहीचे प्रॉमिस देऊन


प्रॉमिस न मोडता उच्च शिक्षणाची

संधी मिळाली दूर देशा 

देशाबाहेर जाण्या विमानात टाकले पाऊल

तिथे पैसे वाचवण्या फिरत राहिलो सायकलनेच खूप


आरोग्याच्या काळजीने

सकाळी धावत सुटायचो

कॉलनीतल्या एका टोकापासून 

दुसऱ्या टोकापर्यंत


उच्च शिक्षण संपले

नोकरीही मिळाली छान

गर्लफ्रेंडचेही रूपांतर झाले मिसेसमध्ये

नवऱ्याचे रूपांतरही झाले पप्पामध्ये


स्वतःतच मशगुल होतो

विसरून गेलो कर्तव्य मुलाचं

पोहचण्या त्या तिथे नव्हता वेळ

आई-बाबांच्या अंतिम प्रवासाला खांदा देण्यास


Rate this content
Log in