Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

बळीराजाची कथा

बळीराजाची कथा

1 min
463


कथा सांगतो राजाची

नाव आहे त्याचं बळी

पाणावले डोळे नित्य

नाही गाली कधी खळी


एक एकरी शेतात

साऱ्या आयुष्याचे दाणे

लाख मोलाच्या स्वप्नांचे

त्याने पेरले बियाणे


दान लेकीचं पदरी

गोड गोजिरं देखणं

पोर वयात आलेली

भाग होतं उजवणं


आला भरून दुष्काळ

रिता झाला आसमंत

हुंड्यापायी घात झाला

त्याच्या मनी हीच खंत


काळ्या आईचं तारण

दिसा मागे दिस गेलं

गळा सावकीचा पाश

व्याजापायी शेत नेलं


काय वाढलेलं भाळी

त्याला ठाऊकच नाही

दोर झाडाला बांधता

झालं दिसेनासं काही


असा होता एक बळी

फक्त नावालाच राजा

हलाखीचं जीणं ज्याचं

नाही घास कधी ताजा


Rate this content
Log in