Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dilip Yashwant Jane

Others

5.0  

Dilip Yashwant Jane

Others

उत्तर

उत्तर

1 min
506



एकविसाव्या शतकातही

जन्मानं आमच्या उरात तुमच्या

धडकी का भरावी हो ?

उत्तर मला हवे हो !


समतेच्या गप्पा बाहेर मारता

घरात मात्र बायकोला मारता

तुम्हीच सांगा असे का करता ?

उत्तर मला हवे हो !


मुलीला म्हणता परक्याचं धन

जाणत नाही त्यांचं मन

असे का करता सारे जण ?

उत्तर मला हवे हो !


मुलासाठी तुम्ही नवस करता

उमलण्या आधीच कळीला खुडता

तुम्हीच सांगा असे का करता ?

उत्तर मला हवे हो !


घराण्याला वारस हवा म्हणता

गाऱ्हाणं त्यासाठी देवाजवळ मांडता

विज्ञान जाणूनी असे का करता ?

उत्तर मला हवे हो !


वंशाला दिवा हवा म्हणता

मुलासाठी नादी भोंदूंच्या लागता

पणतीकडे सदा दुर्लक्ष का करता ?

उत्तर मला हवे हो !


बायको सुंदर सोज्वळ पाहता

आई ही वत्सल हवी म्हणता

जपतांना ही नाती आम्हा का नाकारता ?

उत्तर मला हवे हो !


Rate this content
Log in