Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
मनीच मी घाबरतो!
मनीच मी घाबरतो!
★★★★★

© Nagesh Dhadve

Others

1 Minutes   1.2K    0


Content Ranking

माणसासारखा माणूस मी
स्वप्न सुद्धा पाहतो
या गरिबीच्या नात्यांशी
विचारांत नाहतो
भूक लागे माज्या पोटी
स्वतःभोवती धावतो
अपमानांच्या या दुनियेशी
मनीच मी घाबरतो !

भरदुपारी उन्हाशी
विचार मांडू कोणाशी ?
हातपाय गळुनी
आजारपण कळूनी
सुखी स्वप्न पाहतो
एकटेपणाच्या सहवासाने
मनीच मी घाबरतो !

रातभर चांदण्यांशी
पुट्पुटतो या जगाशी
चारही दिशा काळोखाच्या
दुःखाने या मावळत्या
या अंधाराची वाट पाहतो
अंत नसलेल्या अश्रूंना
मनीच मी घाबरतो !

आता दमलेल्या शरीराला
साथ नाही कोणाची
मरण जरी उभे राहिले
तरी भीती नाही जगाची
जखडलेल्या मनाला
मुक्त करू पाहतो
या स्वार्थी लोकांच्या जगी
मनीच मी घाबरतो!

-नागेश(ndd)

शब्द माझे...

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..