Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

ANIL SANGLE

Tragedy

5.0  

ANIL SANGLE

Tragedy

*गेला*

*गेला*

1 min
321

 ''भर तारुण्यात विधवा करून गेला"

" हे अमृत आयुष्याचे ठोकरुन गेला " ..धृ ..२

 ' लाऊनी संगत नर्कातील नर्तकीची ,

 " घरच्या लक्ष्मीला मग ठोकरुन गेला "..धृ..३ 

' बुका स्वप्नी माझ्या नव्हता कधीच आला , 

" कुंकवाचा धनी मला पोखरुन गेला "..धृ..४ 

' विकली शेती वाडी विकला राजवाडा , 

" परमीटवाल्यांचे सोने करुन गेला "..धृ..५ 

' दारु महाग झाली तक्रार ना कुणाची ,

 " महसुल वाल्यांची चांदी करुन गेला ".धृ..६

 ' विनवीले मी नको संगत लाचारांची , 

" विनंती अर्धांगीनीची झुगारुन गेला "..धृ ..७ 

' हि-या समवेत खेळे जीवंत असताना ,

 " शेवटी त्याचे कोळसे तो करुन गेला "..धृ ..८

 'भर तारुण्यात विधवा करुन गेला ...धृ ...

 "काळजावर घाव माझ्या करुन गेला " धृ.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy