कधी कधी तू खूप बोलतोस
कधी कधी तू खूप बोलतोस
कधी कधी तू खूप बोलतोस
तुझ्याही नकळत तुझ्या मनातले खोलतोस
मी भारावून जाता तुझ्या नयनात
तू भावनांचा पसारा आवरत गप्प होतोस
कधी कधी तुझ्या प्रेमाचा
तुझ्याही नकळत ताबा सुटतो
मी समोर असतानाही
तू स्वप्नात मला शोधत असतो
मी रोखिता कटाक्ष भेदक
भानावर असल्याचा आव आणतो
माझ्यासमोर असताना
तूच तुझ्यातून वेगळा होतोस