कविता - आपली मराठी
कविता - आपली मराठी
1 min
13.7K
मराठी असे माझी मायबोली
सर्व ठिकाणी असावी हीच बोली
किर्तीरुपाने दिगंत नित्य रहावी
साहित्य रूपाने मनात ही बोली .....।।
कवी असो वा असोत लेखक
कौतुक गावे सदाच तुम्ही
गा मराठी , लिहा मराठी
बोला भाषा आपली मराठी.............।।
ज्ञानशाने म्हणलेची आहे
अमृता समान आहे मराठी
करू पोषण मनाचे आपुल्या
अमृत प्राशन करुया मराठी ............।।
आजचे पालक असुद्या ध्यानी
नव्या पिढीच्या ठसवावे मनी
संस्कार धन आहे ही मराठी
बोलती ठेवा आपली मराठी ..............।।