मन आईचे
मन आईचे
1 min
179
पहिला थेंब पहिला तो शहारा
विरहानंतर स्पर्श पहिला
प्रेम भेट गगन वर्षा
गंधांचीत ही तप्त काया
हिरवांकुरित रोम रोम
जन्म नवा कणकणातुनी
पाझरतो ममतेचा पान्हा
कवटाळे मज उरी सुखाने
कुशीत मायेने कुरवाळे
हिरवाईने नटते फुलते
भोळी आशा उमेद तिची
जपेन फुलवेन तिला असेच?
मन आईचेच शेवटी!
मन आईचेच शेवटी!