Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

खंत

खंत

1 min
308



आता मरणाची खंत कश्याला ?

जगणे अवघे सार्थक झाले.

आता जगण्याची लाज कश्याला ?

घ्यायचे ते घेऊन उरले.


आता मरणाची खंत कश्याला ?

जगणे अवघे सार्थक झाले...

 

आता फुकाचा गर्व कश्याला ?

द्यायचे ते देऊन झाले.

आता मरणाची खंत कश्याला ?

 जगणे अवघे सार्थक झाले.


आता उगा स्वार्थ कश्याला ?

सगळे जगणे मी अनुभवले.

आता मरणाची खंत कश्याला ?.

 जगणे अवघे सार्थक झाले.


आता लागले वेध आम्हाला

विसरून गेलो झाले गेले,

आता मरणाची खंत कश्याला ?

जगणे अवघे सार्थक झाले.

 


Rate this content
Log in