Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Abstract

0  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Abstract

नाती शोधण्यासाठी

नाती शोधण्यासाठी

1 min
287


नाती शोधण्यासाठी, तू पुस्तके चाळू नको

मुक्तपणे भेट सा-यांना, कोणालाही टाळू नको


सा-यांना भोगावे लागतात, नशिबाचे भोग

करू नकोस चिंता, उगा जिवाला जाळू नको


येणारा प्रत्येकजण, जावयासाठीच येतो

प्रत्येकासाठी येथे, अश्रू तू ढाळू नको


जाणीव न जयांना, तुझ्या उपकारांची

उगा अशांसाठी, घाम तू गाळू नको


चोथा झाला चावूनी, आता तरी सोडून दे

पुन्हा-पुन्हा त्याच, विषयाभोवती रेंगाळू नको 


विसरुन जा तू सर्व आता, काय जे मी बोललो

जखमा त्या शब्दांच्या, उरात सांभाळू नको  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract