टरबूज
टरबूज
1 min
7.1K
आज आहे बाजारहाट
माझा आहे खुप थाट
दादाने दिले वाटाणे
ताईने दिले फुटाणे
बाबांनी आणले टरबूज
जोडीला आहे खरबूज
टरबुज घेतले ताटात
आईने कापले झटक्यात
टरबुजाची फोड
आहे भलतीच गोड
फोड खाल्ली पटकन
साल टाकली चटकन
टरबूज साली वेचल्या
कचरापेटीत टाकल्या
टाकता टाकता साली
सटकुन मी पडले खाली