चिंब
चिंब
1 min
322
काळोख गडद
लखलखे विज
गडगडाट असा
पाऊस तो भीज
असे कसे झाले
अवचित सारे ?
काही कळण्याआधी
बरसात ती का रे ?
मनाची घालमेल
कशी थांबवावी ?
पडत्या जलधारा
छंद तो जडवी
पहा तो पाऊस
असा बरसला
अशांत मनाला
चिंब करून गेला