Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Yogita Takatrao

Others

5.0  

Yogita Takatrao

Others

क्षण काही हवे हवेसे

क्षण काही हवे हवेसे

1 min
1.0K



क्षण काही हवे हवेसे

गुप्त कप्प्यात जपलेले

ह्रदय नाव त्या जागेचे


माणिक मोती क्षणांचे

सुरक्षित त्यात लपलेले

आवडीचे निवडलेले


क्षण काही हवे हवेसे

आठवणींच्या लहरी

उसळल्या जणू सागरी


कोणा खबरही नाही

ना भिती कोणी पाही ?

दुनियेस अनोळखी मी


क्षणांतच रमते मी

माझे मलाच कळेना

अवघड कोडे हे सुटेना


जेव्हा हवे हे क्षण पुन्हा

हळूच उलगडते पहा

अमुल्य क्षणांचा ठेवा


आनंदाने मग उघडावा

कप्पा तो आठवणींचा

खजिना तो क्षणांचा


ओंजळीत भरून घेताना

हर्षाने वेडं होताना

वेचुन घेते तो एक क्षण पुन्हा


जो क्षण हवासा पुन्हा पुन्हा

नाही तोड हया आनंदाला

जगुन घेते पुन्हा प्रिय त्या क्षणाला


Rate this content
Log in