Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Romance

2  

Pandit Warade

Romance

स्मृतिगंध

स्मृतिगंध

1 min
6.8K

मृदगंध करी स्वच्छंद मनाला धुंद स्मरण तव होता ।

ती 'संध्या' ओलीचिंब तुझा सहवास संगती होता ।।

त्या आम्रतरुच्या गार सावलीत विश्रांती तू घेता ।

ती अवखळ वारा तव अंगाशी दंगा करत होता ।।

तव खांद्यावरच्या पदरचे ते निशाण फडकत होते ।

जणू सावरण्या कुणी यावे म्हणूनि कुणा खुणावत होते ।।

आकाशात, मन गाभाऱ्यातही वादळ उठले तेव्हा ।

कळले न मला हे पाऊल माझे तिकडे वळले केव्हा ।।

आले भरूनि मेघ अंबरी बरसू लागल्या धारा ।

तडतडू लागल्या अवनी तलावर शीतल शीतल गारा ।।

कडाडली वीज क्षणात बिलगले अंगाशी तव अंग ।।

शहारली रोमांचित काया अन मती जाहली गुंग ।।

जीवन जगता अस्वस्थ सखे मनाशी होतो ।

'त्या' मधुर 'स्मृतीचा' गंध आजही सुखद गारवा देतो ।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance