हृदय माझे तू जिंकलेस
हृदय माझे तू जिंकलेस
1 min
771
मित्रा तुला खूप I शुभेच्छा मंगल |
कामना येतील | हृदयातून ॥ १ ॥
वाढदिवशी या | ओंजळ शब्दांची I
ती उधळायची I तुझ्यासाठी ॥ २ ॥
मनोकामना त्या I पूर्ण होवो साऱ्या |
हो अजिंक्य ताऱ्या | कला क्षेत्री ॥ ३ ॥
शब्दांचीच माळ | गुंफली शब्दाने I
अशी विजयाने | स्विकारावी ॥ ४ ॥
हात लावी त्याचे | सोने तू करावे |
तरीही रहावे | स्थितप्रज्ञ ॥ ५ ॥
असे हृदय माझे | तू जिंकलेस रे |
मिळावे तुला रे I हवे तेच ॥ ६ ॥