Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

मोलकरणीची मंगळागौर

मोलकरणीची मंगळागौर

1 min
7.2K


बस गं सुमा,

कशी मी बसू?

बस गं सुमा

कशी मी बसू?


या घरची त्या घरची

भांडी कधी घासू?

रागवेल सासू

कशी मी बसू?


बस गं सुमा

कशी मी बसू?

नवरा जाई कामा

डबा न्हाई दिला

मार देईल मला

कशी मी बसू?


बस गं सुमा

कशी मी बसू?

मुलाची आहे शाळा

वेळ होईल त्याला

शाळेत जायला

कशी मी बसू?


बस गं सुमा

कशी मी बसू?

या घरची त्या घरची

कामं राहून गेली

पगार नाही झाली

कशी मी बसू?


घासू दे भांडी घासू दे

धूणे ही आता धुऊ दे

गप्पा मारायचं राहू दे

कामाचं मला पाहू दे

बस गं सुमा

कशी मी बसू?


Rate this content
Log in