वेचले मी
वेचले मी
वेचले मी कठोर
तुझ्या त्या शब्दांना
बंध घालून घेतले
मी माझ्या कंठांना....(१)
फुलासम तुझे शब्द
ओंजळीत मी भरले
घालवलेले तेच क्षण
नशिबी आता उरले....(२)
शब्दांच्या वादामुळे
नात्यात आला दुरावा
एकमेकांतील मतभेद
कुणी आता दूर करावा....(३)
चौकटीतले जीवन
झाले आहे ग व्यर्थ
तरी तुला ना कळला
माझ्या प्रेमाचा अर्थ.....(४)