Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Chopdar

Fantasy

2  

Varsha Chopdar

Fantasy

हात तुझा माझ्या हाती

हात तुझा माझ्या हाती

1 min
7.1K


हात आईचा बाबांचा

सदा मायेची सावली

येई अनेक संकटे

उभी राहिली माऊली



हात भाऊ बहिणींचा

दंगा धुडगूस भारी

येई दुजा अंगावरी

त्याचे दोन हात करी



हात मित्र मैत्रिणींचा

ठोका असे काळजाचा

गूज गुपित दोघांत

रंग चढवी मैत्रीचा



हात नातेवाईकांचा

नांदे खूशी गोकुळात

असे ओलावा प्रेमाचा

चिंब भिजून सुखात



हात हा पती पत्नीचा

नातं प्रिती जपण्याचा

होई सार्थक जीवन

आहे माणूस हक्काचा



हात शेजारधर्माचा

असे समता बंधुता

वाहे ओझे सुख दु:ख

याला म्हणा मानवता



हात तुझा माझ्या हाती

साथ मिळो अशी फार

नसे कशाची उणीव

हेच जीवनाचे सार


Rate this content
Log in