स्वप्न
स्वप्न
1 min
6.9K
लागवड करून पिकांची
झोप येईल सुखाची
स्वप्न बहरतील आमुची
या आतील मनाची
होईल ठीक सारे
उगवतील तारे
दुःखाना मिटूनी
सुखाची फुटतील झरे
खोट्या आशांना
पूर्ण होऊ दे रे
बळीराजाच्या स्वप्नांना
सुखी होऊ दे रे
पीक आले तरी नीट
आता मनी नाही धीट
रुपयांच्या या भावांना
पिकांची होतेय लूट
आज आमुच्या कष्टानं
मिळतीया भाकर
नाही कामास यायची
तुमची चाकर
-नागेश(ndd)