प्रेमाचे कुलूप
प्रेमाचे कुलूप
प्रेमाचे कुलूप I कोणी बनविले ? I
ते लटकवले I दोरीवर ॥१॥
प्रेमाचीच चावी I त्यास लावलेली I
नाही उघडली I कोणा कशी ? ॥२॥
बंदिस्त कदापि | प्रेम होत नसे |
अंतरीच दिसे | प्रेम रंग ॥३॥
कुणासाठी असे | सांगा लटकावे ? |
अलगद घ्यावे I कोणी तरी ॥४॥
प्रेमा तुझा रंग I ओळखावा कसा ? |
ओठी फक्त हसा | प्रेमभावे ॥५॥