Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

मकर संक्रांत..!

मकर संक्रांत..!

1 min
446


मला वाटलं ढीग भर

कसले कसले संदेश आले

रजई बाजूस सारली

संगत थोडी मोबाईल ची केली

क्रांतीच घडली


तळागाळातल्या सर्वांच्या

शुभेच्छांचा खच पडला होता

अरे बापरे मकर संक्रांत आली वाटले


आतून चहा साठी आवाज येत होता

मी ओपन क्लोज चा उद्योग करण्यात

बोटं पटपटत मोबाईलशी

बॉक्सिंग खेळत होतो


इतक्यात कानावर बॉक्सिंग चा

सणकण दुसरा ठोसा बसला

अहो ऐकलं का....?


चहा थंड होतो, परत गरम करणार नाही..!

वेळेत येतील तर शप्पत...!

म्हंटल आलो बाई...!


संक्रांतच ती

दिवसेन दिवस वाढत जाणारी

आणि हळू हळू ग्रासणारी...!


चहाचा घोट घेतला आणि म्हंटल

आज पासून तरी गोड बोला

तिने लगावला दुसरा टोला

आधी पाणी काढलय आंघोळ करा..!


ही दुसरी संक्रात

तिसरी संकरांत येण्या अगोदरच

काढता पाय घेतला

म्हंटल

आधी फिरून येतो तोपर्यंत तुझं आवरं..!

आणि

पटकन बूट घातले

झटकन बाहेर पडलो

बरं वाटलं

संक्रांत टळली

गोड गोड बोलायला मोकळा झालो..!


तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Rate this content
Log in