बाळशास्त्री जांभेकर जयंती !
बाळशास्त्री जांभेकर जयंती !
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
यांचे पहिले पाऊल पत्रकार म्हणून पडले
पत्रकारतीचे खरे युग सुरु झाले
पाहता पाहता जोमाने वाढले
फुलले खुलले चांगलेच फोफावले
नवं नवे उचांग त्या पत्रकारतीने
अनेक क्षेत्रात प्रस्थापिले
समाजाभिमुख भूमिका निभावून
लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे कार्य
चोख पार पाडले
बाळशास्त्री जांभेकरांच्या लेखणीने
सुरू झालेली पत्रकारिता
अविरत वाहते आहे
नव्या पत्रकारांना आजही
निष्कलंक निर्मळ निर्भीड
पत्रकारितेचे कर्तव्यदक्ष पालन करण्यास
आजही मोलाचे मार्गदर्शकतेचे
पालन करण्याचे बळ देते आहे...
अशी निर्भीड पत्रकारिता सदैव
सचेतन सचेत सजीव निर्भीड
जिवंत राहू दे
पत्रकारितेला उदंड यश
चिरंतन मिळत राहू दे
हीच या पत्रकार दिनी जांभेकरांचे चरणी
काव्यसुमनांजली वाहताना आणि
शुभेच्छा देताना ईश्वर चरणी प्रार्थना...!