अमर जवान
अमर जवान
1 min
7.9K
भारत मातेच्या रक्षणार्थ
अंतिम श्वासापर्यंत लढले
करुनी निर्दालन शत्रूसेनेचे
वीरमरण देशासाठी पत्करले
राखण्या मान तिरंग्याचा
रुधिर देशासाठी वाहिले
झेलूनी गोळ्या छातीवरती
जयगान विश्वात निनादले
'अमर जवान' दिव्यस्मारक
विजयगाथा शूर सैनिकांची
आठवावे शौर्य हुतात्म्यांचे
दिली पूर्णाहुती प्राणांची
राहो अजरामर विजयगाथा
देशप्रेम नसानसांत भिनले
धन्य झाली भारतमाता
शूरवीर या मातीतून जन्मले