सखे तुझ्या विरहात
सखे तुझ्या विरहात
सखे तुझ्या विरहात
सारा व्याकूळला जीव
घरट्यात पाखरांची
जशी चाले चिव चिव ।।
सखे तुझ्या विरहात
गेली आटून आसवे
होत्या हृदयी जखमा
तुला कसे मी सांगावे ।।
सखे तुझ्या विरहात
माझं हरवलं भान
बाभळीच्या झाडाखाली
तुच घेतली ग आण ।।
सखे तुझ्या विरहात
वाट तुझीच चालतो
तुझा भास मला होता
मनालाच मी बोलतो ।।
सखे तुझ्या विरहाने
झालो कसा मी घायाळ
कधी भेटसी मजला
भासे फाटके आभाळ ।।