Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Drama

2  

Abasaheb Mhaske

Drama

यशस्वी माघार

यशस्वी माघार

1 min
7.7K


यशस्वी माघार घ्यावी कधी- मधी ग माणसानं...

पण माघार घेणं तुला जमलंच नाही ...कधी !

प्रत्येकवेळी आपलं खरं असेलच असे नाही...

चुकू शकत आपलंही असं कधी तुला वाटलंच नाही !


माघार घ्यावी खुशाल... आपलंच घोड दामटवण्यापेक्षा...

आपल्याकडन ही असू शकतात कुणाच्या काही अपेक्षा !

कधी -कधी हरुनही जिंकता येत समोरच्याच मन ...

गनिमीकावा असतो तो, कधी तुला समजलंच नाही ... !


मी सांगेन तेच खरं .. हे असंच झालं पाहिजे म्हणतेस ...

अट्टहासच तुझा घात करतो अन तू तोंडघशी पडतेस !

प्रत्येकवेळी कसं होईल बरं तू म्हणशील तसं ?

त्यामुळेच तर होत तुझं चार -चौघात हसं ... !


मान्य आहे ग मलाही स्वभावाला औषध नसतं पण ...

काळाबरोबर बदलून परिस्थितीशी जुळवून घ्यावंच लागतं !

कधी कळणार तुला आपण फक्त नियतीचं हातच कळसूत्री बाहुलं...

काहीही झालं तरी.. डगमगायचं नाही धीरानं टाकायची पावलं ..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama