Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

नागपुष्प...!

नागपुष्प...!

1 min
168


३६वर्षांनी एकदा उमलणारे दर्शनास दुर्मिळ असे नागपुष्प....!


छत्तीस वर्षांनी एकदा उमलणारे

नाग पुष्प पाहून

थोडे मज नवल वाटले

ना ना विचार मग डोक्यात

फेर धरु लागले..

म्हंटले कदाचित

दुर्मिळ योगायोग ही

आपक्या जीवनातही 

कधी कधी पहायला मिळतो

जेंव्हा जेंव्हा 

पत्नीचा आणि आपला सूर जुळतो...


वाटते त्या त्या क्षणी

नवलच घडले

जणू जीवनात

सुदैवानेच 

छत्तीस गुण जमले....


हा सुद्धा बाबांनो

जीवनातला दुर्मिळ

योगायोगच असतो

छत्तीस वर्षात का असेना

एकदा तरी सौभाग्याने जुळतो....


बुवया उंच होतात

चुकल्या चुकल्या सारखे वाटते

देवाचे आभार मानावेत

की कौतुक करावे कळत नाही

नशिबात काय वाढून ठेवलंय

तेही काही समजतही नाही

आणि उमजतही नाही...


इतक्यात माशी शिंकते

आतून हाके सरशी

एक वेगळीच

सुरावट धाडकन ऐकू येते

मी होते म्हणून संसार झाला

मी म्हणून टिकले

नन्तर साऱ्या फुल्या फुल्या...


वाटलंच होत वाटत

इतकं नशीब बलवत्तर कुठलं...?

आमच्या नशीब

कळकट मळकट

कामाला बळकट हेच खरं....!


सार वादळ क्षमतं

दिवस पुन्हा सुरू होतो

एक दिवा स्वप्न

पुन्हा भंगत

मग मात्र संकल्प सुटतो

च्यायला

स्वप्न न पाहिलेलंच बरं

हेच सुखी जीवन खरं....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance