Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

शिकवायचे कसे

शिकवायचे कसे

1 min
160


क्रोधात ग्यान वाणी शिकवायचे कसे

आगेत कोळसे हे टाकायचे कसे ?


हे वागणे कसे तव ,हे बोलणे कसे 

तूझ्या मनातली सय जाणायचे कसे ?


थांबून या तिरावर पाण्यात पोहण्या

खोली किती असे ती शोधायचे कसे ?


डोळ्यात आसवांची झाली अमाप गर्दी

सारायचे कसे नी हसवायचे कसे ?


संसार यातनेतुन आभास रोज मिळे  

यातून पार जाण्या निस्तरायचे कसे ?


आकाश चांदण्या या । लपतात का नभी

कर्तव्य करावया हे । सलटायचे कसे ?


फुलण्यास माणसाला। झासे नवे नवे 

उसळू नको कसे हे । सांगायचे कसे ?



Rate this content
Log in