गणपती गजानन
गणपती गजानन
1 min
7.2K
देवांचाही देव तू असशी जरी सान
सुरासुरांनी दिला आद्यपुजेचा मान
तुंदिल तनु तव सुपासारखे कान
आवडे तुज दुर्वा जास्वंद शमी पान
मूषक राज तुझे असे प्रिय वाहन
विघ्नहर्ता तूच देई सुखाचे दान
नित्य स्मरणाने मिळते समाधान
गाता तव महिमा नसे कशाची वाण
लिटल गणेशा तू, तू पार्वती नंदन
सर्वांआधी तुजला करिते मी वंदन