Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Kadam

Tragedy

5.0  

Prashant Kadam

Tragedy

अत्याचार

अत्याचार

1 min
593


गरम तव्यावर पाणी शिंपडल्यावर

येणाऱ्या आवाजाप्रमाणे 

मुसमुसून हमसून ती रडत होती

आठवण पुसण्याचा प्रयत्न करत होती


पण ते अजिबात जमत नव्हतं

कारण तिच्या दुर्बल शरीरात जीव होता 

पण कोमल शरीरावर झालेले आघात

अत्याचार कोरले गेले होते हृदयात


तिच्या मनातील कटू शल्य

सतत खूपत होते काळजात

ओढवलेल्या विचित्र अनुभवांमुळे 

ती एवढी विषण्ण झाली होती


दोष नव्हताच मुळी कधी तिचा

होता समाजातील विकृतीचा

नराधमांनी साधला होता डाव

एकाकी गाठून घातला गेला घाव


प्रश्न तिचा केवळ एकच होता

त्यांचे मी काय वाईट केले होते?

त्यांना त्यांचे कुटुंबीय नव्हते का?

आई, बहीण, पत्नी कुणी नाही का?


केवळ विकृत लालसेपोटी

केला गेला अमानुष अत्याचार

अन् निरागसतेला आयुष्यातूनच उठविले

न्यायव्यवस्था करेल का याचा विचार 


मिळेल का न्याय निरागस मुलीला?

थांबेल का समाजातली विकृती?

प्रशासन घेईल का याची दखल?

फिरतील का लेकी सुना निर्भयतेने?


Rate this content
Log in