Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

गझल

गझल

1 min
352


गझल


"ही काय चूक आहे"


आहे तसेच दिसणे *ही काय चूक आहे*?

जगलो तसाच जगणे *ही काय चूक आहे*?


रुजता गरीब इतका भाग्यात खाचखळगे 

जमले नसेल शिकणे *ही काय चूक आहे*?


सारे जिला हिणवती साधी सुजान नारी

त्या भावनेस पुजणे *ही काय चूक आहे*?


कष्टात जाग जेंव्हा शेतात राबवूनी 

वेड्यापरीस झुरणे *ही काय चूक आहे*?


न्यायालयात खटले चाले कितीक महिने

मर्त्यास न्याय मिळणे *ही काय चूक आहे*?


ही जोड मैत्र जीवा, तू माणसात नसतो

नाते नवीन विणणे *ही काय चूक आहे* ?


केलेस पुण्य कुठले, मी जाणले कधी ना

देेवा तुला फुलवणे *ही काय चूक आहे*?...


Rate this content
Log in