Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Warade

Drama Tragedy

3  

Pandit Warade

Drama Tragedy

बळीराजा

बळीराजा

1 min
6.9K


काळीज माझं तेव्हा आभाळा एवढं होतं ।

कानावर माझ्या जेव्हा 'बळीराजा' नाव येतं ।।


काळ्या मातीच्या कुशीत बीज कसं उगतं ।

पीक पाहून रानात माझं काळीज फुगतं ।।


'शेतकरी राजा साऱ्या जगाचा पोशिंदा आहे' ।

सारे जग आज मोठ्यानं ओरडत आहे ।।


ऐकताना आभाळही वीतभर ठेंगणं वाटतं ।

मलाही देवाच्या रांगेत बसल्या सारखं वाटतं।।


पण जेव्हा मी बाजारात माल घेऊन जातो ।

तिथल्या वागणूकीनं तोरा खर्रकन उतरतो ।।


हळूहळू आता मला लक्षात येऊ लागलं ।

मी नावाचाच 'बळी'राजा आता कळू लागलं ।।


कुर्बानीच्या बकऱ्यासारखं जिणं माझ्या भाळी ।

जगाच्या पोषणासाठी जायचं मला 'बळी' ।।


Rate this content
Log in