स्त्रीचे जीवन
स्त्रीचे जीवन
स्त्रीचे जीवन
सुखाचे वरदान
पवित्र दान....१
स्त्रीचे जीवन
अनमोल हे देणे
मातृत्व लेणे....२
स्त्रीचे जीवन
ममतेची ती छाया
आईची माया....३
स्त्रीचे जीवन
बहिणीची सावली
जणू माऊली....४
स्त्रीचे जीवन
मिळे नाते अनेक
बहिण,लेक....५
आई मावशी
कैक नाते नवीन
स्त्रीचे जीवन....६
स्त्रीचे जीवन
संस्कार भरपुर
गोड मधुर....७
काही जणांना
स्त्री जीवन नकोसे
दुर्दैव कसे ??? ८
स्त्रीचे जीवन
करा तुम्ही रक्षण
ती संजीवन....९
स्त्रीचे जीवन
असावी गोड कथा
नसावी व्यथा....१०
स्त्रीचे जीवन
चरणी ठेवू माथा
उक्तट गाथा....११
स्त्रीचे जीवन
जगते मी आंनदे
मुक्त स्वच्छंदे....१२