Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Dilip Yashwant Jane

Others

5.0  

Dilip Yashwant Jane

Others

क्षण

क्षण

1 min
674


क्षण अखेरचे असे

बाकी मोजके राहिले

आप्त स्वकीय मनात

थोडे उरुन राहिले


आठवतो आता त्यांना

प्राण डोळ्यात आणून

वाट पहातो तयांची

वेळ अखेर जाणून


बंद मुठीतून माझ्या

निसटले क्षण सारे

झाकलेल्या मुठीतून

गेले वाहून ते वारे


भेटतील का पाखरे

प्रश्न मनास पडले

वार्धक्यानं जरी आता

नाते मृत्यूशी जडले


Rate this content
Log in