स्वप्नंसुंदरी
स्वप्नंसुंदरी
ती असावी बागडणारी स्वच्छंदी
ती असावी कवी मनाची आनंदी
नाजूक हास्याचा ती तुषार
गुलाब तिच्या रूपाचा पाबंदी...
ती असावी मनात
ती असावी स्वप्नांत
आठवण आलीच कधी तर
यावी समोर क्षणात....
रणरागिणी जशी सौंदर्याच्या रणात
बागडणारे फुलपाखरू रानात
मयूर अदांचा नाचती वनात
मोगरा जणू फुलला अंगणात
गुजगोष्टी सांगणारी कानात.
कवी मनाची भावना माझी
कधी प्रकटावी आयुष्यात......