निसर्ग किमया
निसर्ग किमया
1 min
607
वसंत ऋतुत / फुटते पालवी
मनाला भूलवी / निसर्ग हा ।।
निसर्ग किमया / आंब्याला मोहर
करतो कहर / मेघ राजा ।।
निसर्गाचे चक्र / फिरे गोल गोल
राखा समतोल / निसर्गाचा ।।
नका करु आता / जंगल सपाट
वळनाची वाट / मोडू नये ।।
नभाच चांदणं / खुले धरा काया
ही सारी किमया / निसर्गाची ।।
उन वारा पाणी / वृक्ष उभा जळे
खायादेतो फळे / निस्वार्थाने ।।
खळ खळ वाहे / सरीताचे पाणी
पक्षी गोड गाणी / गात असे ।।